Ad will apear here
Next
महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत चमकले पार्वती शंकर विद्यालयाचे विद्यार्थी

उत्तूर (कोल्हापूर) : येथील श्री. शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल व चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या श्री पार्वती शंकर शैक्षणिक संस्था संचालित श्री.पार्वती शंकर विद्यालयाचे ५ विद्यार्थी पुण्यातील नौरोसजी वाडिया महाविद्यालय यांच्या वतीने एप्रिल २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत. 

राज्यस्तरावर यशस्वी झालेल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांमध्ये निखील देऊस्कर (१४८) राज्यात ३३ वा, श्रेयस देशमाने (१३९) राज्यात २१ वा, निशांत मातले (१३६) २४ वा, रोहित कसबेकर (१८५) राज्यात २१ वा, ओंकार सारोळकर (१७९) २७ वा यांचा समावेश आहे. 

जिल्हास्तरावर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये निमिष पाटील (१४२) जिल्ह्यात पाहिला, उत्कर्ष बिल्ले (१३८) जिल्ह्यात पाचवा, सानिध्य रावण (१३८) जिल्ह्यात पाचवा, सुयाग लोखंडे (१२८) जिल्ह्यात तिसरा, भूषण बोरनाक (१२५) जिल्ह्यात सहावा, प्रणव फराकटे (१७४) जिल्ह्यात तिसरा, तसेच स्पेशल बक्षिसासाठी १३ विद्यार्थी, तालुकास्तरीय शिष्यवृत्तीसाठी दोन विद्यार्थी व कंसोलेशन प्राईज १ , प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थी ३५ या सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत उज्जवल यश संपादन केले आहे. या परीक्षेत सर्वाधित यश मिळवणारी श्री. पार्वती शंकर विद्यालय ही एकमेव शाळा आहे. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एम. यु. शिकलगार वा शिक्षक व्ही. टी. पाटील, पी. एस. वंजारे, पी. एन. केसरकर, बी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.

संस्थेचे अध्यक्ष बसवतराज अण्णा कंरबली, उपाध्यक्ष विश्वनाथ अण्णा करंबळी, सचिव सुरेश मुरगुडे, संचालक डॉ. व्ही. एम. पाकले, प्रा. डॉ. दिनकर घेवडे, विजय सावेकर यांच्याकडून वेळोवेळी प्रेरणा व कामाची दिशा मिळाली. यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेने मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.   
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZIOBE
Similar Posts
गुणवंतांचा सन्मान आणि नवागतांचे स्वागत उत्तूर (कोल्हापूर) : येथील पार्वती शंकर विद्यालयात दहावीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच नवागतांचे स्वागत करण्यात आले.  उत्तूर येथील श्री शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल व चॅरिटेबल ट्रस्ट संचलित पार्वती शंकर शैक्षणिक संस्थेच्या शैक्षणिक संकुलात मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या एस
श्री पार्वती शंकर विद्यामंदिरात शिक्षक दिन उत्साहात उत्तूर : पार्वती शंकर शैक्षणिक संस्थेचे विद्यामंदिर व विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. शिक्षकांप्रति आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दहावीतील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेतरांच्या भूमिका शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्या. गणराज पाटील याने
उत्तूर येथे झिम्मा फुगडी व हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात पार उत्तूर (कोल्हापूर) : येथील शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल व चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने पार्वती शंकर शैक्षणिक संकुलात महिलांचा झिम्मा फुगडी व हळदी-कुंकू कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. शालेय गणेश पूजनाचे कार्यक्रम शाळामधून दुर्मिळ होत असताना या शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात
विद्यार्थी वारकरी दिंडीचा कार्यक्रम उत्तूर (कोल्हापूर) : उत्तूर येथील शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल व चॅरिटेबल ट्रस्टतर्फे संचलित पार्वती शंकर बालमंदिर (इंग्रजी माध्यम) आणि विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी वारकरी दिंडी आयोजित करण्यात आली होती. आषाढी एकादशीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दिंडीमध्ये संत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language